
अमळनेर:- तालुक्यातील गांधली आणि पिळोदे गावांमध्ये विप्रो वॉटर कन्झर्वेशन प्रकल्प (WWCP) 2023-25 च्या माध्यमातून मोठी जलक्रांती घडवण्यात आली आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था (MGVS) आणि विप्रो केअर्स यांच्या सहकार्याने या गावांमध्ये जलसंधारणाचे व्यापक काम हाती घेण्यात आले. परिणामी, पाणीटंचाईवर मात करत शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळाली आहे.

प्रकल्पाची भव्य कामगिरी…
गांधली व पिळोदे गावा मध्ये १५.१५ कोटी लिटर अतिरिक्त जलसाठा निर्माण करण्यात आला असून २.६ कि.मी. नदीचे खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण केले. गांधली येथील 3.5 एकर मधील पडीत जमीन पुनर्जीवित करून गाव तळे मध्ये रूपांतरण करून ४१,७१६ घन मीटर क्षमतेचे पाणी साठवण क्षमता वाढवली , ज्यामुळे शेकडो एकर शेतीला पाणी मिळणार आहे.३ सिमेंट नाला बंधारे आणि १ कोअर वॉल गॅबियन बांधकाम पूर्ण करण्यात आले असून २७३ शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत ५ पाणी वापर गट स्थापन झाले आहेत. तसेच ४ ग्रामविकास समित्यांची स्थापना करून महिलांसाठी विशेष WVDC तयार करून सक्षमीकरण करण्यात आले.
शाश्वत जलसंधारणासाठी ठोस पावले ३,३३५ जंगल वृक्षांची लागवड – (२,७८४ बांबू, ४४२ चिंच, १०९ जांभूळ)
१,९३३ फळझाडांची लागवड – (६८ शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग)
२४ भिंतींवर जलसंवर्धन संदेश असलेली चित्रे व ६८० स्टिकर्सद्वारे जागृती मोहीम
२४०+ विद्यार्थ्यांचा जलसंधारण रॅलीत उत्स्फूर्त सहभाग
चित्रपट प्रदर्शन, मोटिवेशनल कार्यक्रम, व जलसाक्षरता अभियान राबवले
पाण्यासाठी एकत्र आले संपूर्ण गाव…
गांधली आणि पिळोदे गावांतील जलसंधारण प्रकल्पाच्या यशासाठी विप्रो केअर्सचे प्रवीण बीचगोन्दाहाल्ली, श्रीमती नेहा परमार, विप्रो इंटरप्रायझेसचे जितेंद्र शर्मा, आनंद निकम, चेतन थोरात, सुधीर बडगुजर, भावेश साळुंखे तसेच एम.जी.व्ही.एस.चे संचालक श्री अप्पासाहेब उगले, प्रकल्प व्यवस्थापक ओमकार उगले, गांधली सरपंच नरेंद्र पाटील, पिळोदे येथील प्रकाश आबा पाटील, ग्रामविकास समिती सदस्य, उपसरपंच व समस्त ग्रामस्थ यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गांधली-पिळोदे येथे जलसंधारण प्रकल्प एक नवा दिशादर्शक आदर्श ठरत आहे. या उपक्रमामुळे शेतीसाठी मुबलक पाणी मिळणार असून, जलसुरक्षेच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.