
अमळनेर : विभक्त झालेल्या पतीने मागितलेला घरगुती सामान परत करायला गेलेल्या पत्नीला सासू ,दिर व भाच्याने शिवीगाळ तर पतीने लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना १४ रोजी सायंकाळी घडली.

जागृती दिनेश पाटील (रा शिवाजीनगर पैलाड) ही महिला दोन महिन्यांपासून आपल्या पती पासून विभक्त राहते. पतीने घरगुती सामान परत मागितला म्हणून ती सामान घेऊन शनीपेठ पैलाड येथे गेली असता सासूबाई कल्पनाबाई रातीलाल पाटील व भाचा हर्षल पंडित पाटील यांनी शिवीगाळ करून मुलीला चापट बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिचा दिर मंगेश पाटील याने दमबाजी केली. महिला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सामान परत केला हे सांगायला पती काम करत असलेल्या सुयश बियर बार मध्ये गेली तेव्हा पती दिनेश पाटील याने हातातील लाकडी दांडक्याने खांद्यावर ,पायावर , हातावर जबर मारहाण केली. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून महिलेचा पती , सासू ,दिर आणि भाचा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८,११५ ,३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.




