
श्री. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठ गमन वर्षा निमित्त आयोजन
अमळनेर-श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठ गमन दिवस (वर्ष)बिज निमित्त एक दिवशीय पालखी व किर्तन सोहळ्याचे आयोजन आज रविवार दिनांक 16 रोजी अमळनेर येथे करण्यात आले आहे.

संत सद्गुरु सखाराम महाराज यांच्या पावन भुमित प.पू. प्रसाद महाराज यांच्या आशिर्वादाने मिती फाल्गुन कृ ||२|| शके १९४७ दि. १६ मार्च रविवार रोजी दुपारी ४ वा.श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान मंदिर अमळनेर येथुन पालखी मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. वाडी चौक,पानखिडकी, सराफबाजार, दगडीदरवाजा, राणी लक्ष्मीबाई चौक, कुंटेरोड तिरंगाचौक, पवन चौक, त्रिकोणी बगीचा चौक,वडचौक,शिरुडनाका येथील दुर्गेश्वर महादेव मंदिर जवळ समाप्ती होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील,जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई अनिल पाटील आदींची उपस्थिती लाभणार आहे.
रात्री हभप श्री लक्ष्मण महाराज शास्त्रीचे कीर्तन
रात्री 8 वाजता जय अंबे मित्र मंडळ,दुर्गश्वर महादेव मंदिर शिरुड नाका येथे ह.भ.प.श्री. लक्ष्मण महाराज शास्त्री, खेडी भोकरकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी पाटील समाज बहुउद्देशिय मंडळ, अमळनेर तसेच नवीन व जुनी कार्यकारणी मंडळ समस्त कुणबी पाटील समाज बांधव, कुणबी पाटील महीला मंडळ, तरुण युवा मंडळ तसेच अमळनेर तालुका कुणबी पाटील व मराठा समाज, अमळनेर यांनी आयोजित केला आहे.तरी सर्व समाजबांधवानी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान पालखी मिरवणुकीत येतांना समस्त समाजबांधव यांनी पांढऱ्याशुभ्र पोषाखात यावे तसेच पांढरीशुभ्र टोपी स्वतः आणावी असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी मो. ९६८९३९१७२२, ९४२२६५२८७१,८७६७७५३५३५ यावर संपर्क साधावा.