
अमळनेर:- येथील मराठा महिला मंडळाचा दिनांक 16 तारखेला मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध प्रबोधनकार श्रीमती रत्नमालाताई पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊंचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नमाला पाटील त्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व महिलांनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रास्ताविक करताना मंडळाच्या अध्यक्ष तिलोत्तमा पाटील यांनी म्हटले की मला मंडळाची धुरा सांभाळायला आठ वर्षे पूर्ण झाली तरी यापुढे मराठा महिला मंडळाचे अध्यक्ष पदाचे काम सर्वानुमते प्रा.शीला पाटील यांच्याकडे मी सोपवित आहे, त्यांनी यापुढें मंडळाची ही धुरा सांभाळावी असे सांगताच सर्व महिलांनी या निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रथमतः शीला पाटील यांचा सत्कार रत्नमाला ताई व सौ. तिलोत्तमाताईंच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपाध्यक्ष म्हणून सौ अलका विनोद पाटील व सौ.माधुरी पाटील यांची निवड करण्यात आली. सौ.अलका ताईंचा सत्कार जयश्रीताई व रत्नमाला ताई यांनी केला सत्काराला उत्तर देताना रत्नमाला ताईंनी सर्व संतांच्या कार्याचा आढावा घेतला संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील अभंगाचे रूपाने त्यांनी सविस्तर वर्णन केले. संत तुकारामांनी त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाची खूप मोठे काम केलेले आहे असे सांगून अनेक संतांच्या अभंगांचा उल्लेख त्यांनी केला. त्यांचा संत साहित्यावरील गाढा अभ्यास या ठिकाणी दिसून आला. त्या प्रवचन कीर्तनही करतात. कार्यक्रमासाठी सौ. सुलोचना पाटील,सौ.लीनापाटील,सौ. पद्मजा पाटील, सौ. मंगला पाटील, सौ.प्रभा पवार, सौ.रागिणी पाटील, सौ. मनीषा पाटील यांनी काम पाहिले तसेच सौ. भारती आक्का पाटील व सौ भारती पाटील यांनी सूत्रसंचालनाचे काम केले तसेच सौ भारती (आधार) पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.अशाप्रकारे महिला दिनानिमित्ताचा कार्यक्रम सादर झाला.




