
भारत टॅलेंट सर्च परिक्षेत पळासखेडे बु.येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इ.२ री तील विद्यार्थिनी समिक्षा विलास पाटील हिने अमळनेर केंद्रातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. इ.३ रीतील हरीप्रिया राजेंद्र मराठे , खुशी अशोक मराठे व किर्ती दत्तात्रय मराठे या विद्यार्थिनींनी अमळनेर केंद्रातून अनुक्रमे प्रथम , द्वितिय व तृतिय क्रमांक मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक शरद भोई सर यांचे मार्गदर्शन लाभले होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.




