
सुमारे सव्वा कोटींची झाली वसुली, कौटुंबिक वादविवादात पती पत्नीत झाली दिलजमाई
अमळनेर-येथील न्यायालयात दिनांक 22 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत 111 खटले निकाली निघून एकूण 1 कोटी 27 लाख 19 हजार 282 वसुली करण्यात आली.

तर वाद पूर्व खटल्यात तडजोड होऊन 78 खटले निकाली निघाले यात 36 लाख,58 हजार 578 एवढी वसुली करण्यात आली.या लोक अदालतीचे वैशिट्य म्हणजे एका कौटुंबिक खटल्यात पती व पत्नीत दिलजमाई होऊन महिला नंदण्यासाठी गेल्याने तिचा सत्कार करण्यात आला.या अदालतीत मोटार अपघात,दिवाणी वाद,बँक वसुली, तसेच वाद पूर्व खटल्यात बीएसएनएल व महावितरण वसुली आदी खटले ठेवण्यात आले होते यासाठी चार पॅनल गठीत करण्यात आले होते, यात पहिल्या पॅनल मध्ये
जिल्हा न्यायाधीश श्रीमती सी व्ही पाटील व
ऍड कापडणे,दुसऱ्या पॅनल मध्ये दिवाणी न्यायाधीश वतिष्ठ स्तर न्या पी पी देशपांडे व ऍड मंगेश पाटील,तिसऱ्या पॅनल मध्ये दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी निलेश येलमाणे आणि ऍड सुदाम पाटील तर चौथ्या पॅनल मध्ये दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी न्या एस एस जोंधळे आणि ऍड सैदाने आदींचा समावेश होता.
सदर न्यायालयात सौ
ज्योती अतुल पवार व अतुल शांताराम पवार यांच्यात
कौटुंबिक वाद होऊन याबाबत खटला सुरू असताना त्यांच्यातील वाद महिला नांदायला गेल्याने उपस्थित न्यायाधीशांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच अमळनेर अर्बन बँकेतील कर्जदार व बँक यांच्यात काही जुन्या वादात तडजोडी झाल्याने हे वाद मिटविण्यात आले.
यावेळी वकील संघ अध्यक्ष ऍड किरण पाटील,ऍड विलास वाणी,के व्ही कुळकर्णी,ऍड पी ए भट,ऍड गजानन विंचूरकर,ऍड रमाकात माळी तसेच सरकारी वकील ऍड रमाकांत पाटील,ऍड कचवे, ऍड किशोर बागुल,ऍड आर बी चौधरी तसेच, ऍड एम जी बागुल,ऍड कच्छवा, ऍड भदाणे यासह वकील बांधव व कर्मचारी उपस्थित होते.




