
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत
अमळनेर -येथील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालयाचा वरिष्ठ स्तर यांचा वर्धापन दिन अमळनेर न्यायालयात उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली.

दरम्यान अमळनेर येथे 18 मार्च 1989 साली जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, यांची स्थापना अमळनेर,पारोळा व चोपडा तालुक्यासाठी करण्यात आली होती.सदर न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध
सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,यात गितगायन,वक्तृत्व,नृत्य आदी कार्यक्रम पार पडले.न्या.निलेश येलमाणे यांच्या कन्येने मराठी भाषेवर सुंदर वक्तृत्व केले.तर ऍड विलास वाणी यांनी न्यायालयातील विविध गमतीदार किस्से सादर केले.यावेळी जिल्हा न्यायाधीश श्रीमती सी व्ही पाटील,दिवाणी न्यायाधीश वतिष्ठ स्तर न्या पी पी देशपांडे,दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी निलेश येलमाणे, न्या एस एस जोंधळे,न्या श्रीमती ए यु यादव ,अमळनेर वकील संघाचे अध्यक्ष ऍड किरण पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड आर व्ही निकम व ऍड अशोक बाविस्कर यांनी केले.कार्यक्रमास समस्त वकील बांधवानी हजेरी लावली.




