
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथे अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई करण्यात आली व ट्रॅक्टर अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. पंचक्रोशीत या कारवाईबाबत चर्चा सुरू होती.

23 मार्च रोजी दुपार 12:30 वाजता तांदळी येथे एक अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. हे टॅक्टर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले. पथकात जोगी, विक्रम कदम (ग्राम महसूल अधिकारी शहापुर), प्रविणकुमार शिंगारे (ग्राम महसूल अधिकारी सावखेडा), अभिमन जाधव (ग्राम महसूल अधिकारी कन्हेरे), जितेंद्र पाटील (ग्राम महसूल अधिकारी शिरसाळे बु. ) राजेंद्र केदार (ग्राम महसूल अधिकारी पळासदळे), आकाश गिरी (ग्राम महसूल अधिकारी पातोंडा), सचिन बामनाथ (ग्राम महसूल अधिकारी करणखेडा), वासुदेव तिरमले (कोतवाल शहापुर) यांचा समावेश होता. रविवार असुनही कार्यतत्पर महसूल पथकाने केलेल्या धडक कारवाईदरम्यान धानोरा फाट्याजवळ एका फसलेल्या बनवाबनवीची चर्चा मारवड कळमसरे पंचक्रोशीत रंगली होती.




