
अमळनेर : तालुक्यात ४०६४ असाक्षर असून २३ मार्च रोजी ३ हजार ८९३ असाक्षर आजी आजोबांनी चाचणी परीक्षा दिली आहे.

शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत असाक्षर नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लिहिता वाचता येण्याइतपत साक्षर करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा असाक्षर लोकांची असाक्षरी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी अमळनेर तालुक्यातील ९८ केंद्रांवर २३ मार्च रोजी घेण्यात आली. अनेक वयोवृद्ध आजी आजोबांनी आनंदाने परीक्षा दिली.
असाक्षरांच्या परीक्षा नियंत्रणासाठी जिल्हा परिषद व माध्यमिक शाळाचे शिक्षक नियुक्त करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी राबसाहेब पाटील , केंद्रप्रमुख रवींद्र पाटील , चंद्रकांत साळुंखे , शरद सोनवणे , दिलीप सोनवणे ,अशोक सोनवणे ,राजेंद्र गवते, किरण शिसोदे , ज्ञानेश्वर पाटील , विशेष शिक्षक देवेंद्र पाटील ,किशोर पाटील , तुषार बाविस्कर ,अमोल पाटील यांनी केंद्रांवर भेटी दिल्या.
चित्रे ओळखणे ,वर्णन करणे ,अक्षर ओळखणे ,संख्या ओळखणे आदी प्रश्न आजीआजोबांना विचारण्यात आले होते.




