
सहा फ्लॅट सील व 240 नळ जोडणी बंद…
अमळनेर-येथील नगरपरिषदेच्या सन 2024-2025 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर सुमारे १३ कोटी ७१ लाख रुपये नागरिकांकडून येणे असून पालिकेची वसुली १० कोटी २१ लाख ५० रुपये झाली आहे. कराच्या वसुली साठी नगरपरिषदेने २४० नागरिकांचे नळ कनेक्शन बंद केले आहेत.

अमळनेर शहरात २५ हजार मालमत्ता धारक आहेत. तर १७ हजार नळ कनेक्शन धारक आहेत. एकूण घरपट्टी ९ कोटी ४ लाख ९३ हजार आणि पाणी पट्टी ४ कोटी ६६ लाख रुपये अपेक्षित आहे. घरपट्टी ७१.४४ टक्के तर पाणी पट्टी ८०.४७ टक्के वसूल झाली आहे.
या भरारी पथकाने सुमारे १२०पाण्याच्या मोटारी जप्ती सह सुमारे २४० नळ कनेशन बंद केले आहेत.या मोहिमेत शैक्षणिक संस्था, चेअरमन वर्किंग वूमन हॉस्टेल यासह चार थकीत मालमत्ता धारकांकडे नगरपरिषद अमळनेरची मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणात रक्कम येणे असल्यामुळे त्यांना त्यांची मालमत्ता जप्तीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.
तसेच सहा फ्लॅटधारकांनी थकीत मालमत्ता कर न भरल्यामुळे सील लावण्यात आले आहे. या सह इतर थकबाकी धारकांच्या मालमत्तावर नगरपरिषदेचे नाव लावण्यात येईल अशी समज प्रत्येक थकबाकीदारास देण्यात आलेली आहे.वरील कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वारंट अधिकारी तथा पथक प्रमुख संदीप जगन्नाथ पाटील, सुनिल शिवाजी पाटील, अजित लांडे , संतोष पंढरीनाथ बि-हाडे ,किरण प्रकाश कंडारे, प्रविणकुमार बैसाणे, डीगंबर वाघ, लौकीक समशेर, तसेच उपमुख्याधिकारी आर.डी. चव्हाण व कर निरीक्षक आर.डी. लांबोळे व अधिनस्त कर्मचारी श्रीमती राधा नेतले, निखिल संदानशिव, जगदीश बि-हाडे, बाळकृष्ण जाधव, अखिल काझी यांचे मार्फत कारवाई करण्यात आली.
दरम्यान अमळनेर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या थकीत कराच्या रकमा त्वरित भरून परिषदेस सहकार्य करावे असे न झाल्यास थकीत मालमत्ता धारकांची नावे त्या त्या प्रभागामधे डिजिटल बॅनर द्वारे प्रकाशित करून बॅनर च्या खर्च देखील थकबाकी धारकांकडुन वसूल केला जाईल तरी नागरिकांनी असा कटू प्रसंग टाळावा असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केलेले आहे.तसेच कराच्या भरणा करणेसाठी सुटीच्या दिवशी देखील वसुली विभाग सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.

