
पत्रकार परिषदेत प्रशासनावर व मलिदा खाणाऱ्यांवर व्यक्त केली नाराजी
अमळनेर-गांधलीपुरा रहिवाशी वस्तीतून वेश्यागृह,वेश्या व्यापार हद्दपार करा ही संपूर्ण गांधलीपुरा वासीयांची मागणी असून जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एका वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला असल्याचे रियाज मौलाना यांनी पत्रकार परिषदेत सांगत प्रशासना विरुद्ध नाराजी व्यक्त केली.

गांधलीपुरा येथील रियाज मौलाना यांच्या वाचनालय व स्टडी सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रा अशोक पवार,संदीप घोरपडे,बी के सूर्यवंशी,बन्सीलाल भागवत, एस सी तेले यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.रियाज मौलाना बोलताना म्हणाले की याठिकाणी माफिया देह व्यापार चालवीत आहेत, विशेष बाब म्हणजे या वैश्या व्यवसाय मधून मलिदा खाणाऱ्या काहीं गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीनी प्रशासन व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून अमळनेर शहरात महिला मेळावे घेऊन त्यात प्रशासकीय अधिकारी यांना आमंत्रित केल्याने सदरच्या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. एक प्रकारे या कार्यक्रमामुळे मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाला कानाडोळा करीत आदेशाची पायमल्ली केल्याची भावना आम्हा आंदोलन कर्त्यांची झाली आहे. त्यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटना संबंधित मुद्दे समाजापर्यंत घेऊन जाऊन जनतेचे प्रबोधन करणार आहोत आणि नंतर आंदोलनाचे टप्पे ठरवणार आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही या बेकायदेशीर कुंटनखान्या विरोधात आवाज उठविला असून न्यायालयातही गेलो आहोत,अनेक अडचनी आम्ही सहन करतोय,मात्र आमचा आवाज दाबला जात आहे, मात्र हा गांधलीपुऱ्याचा आवाज आहे,भर वस्तीत देह व्यापार नको एवढीच आमची मागणी असून या महिलांचे दुसरीकडे पुनर्वसन केले पाहिजे असे सांगत पीडित व याचिका करते/ आंदोलन कर्त्यांना वेश्यागृह चालकाकडून धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे,पोलीस अधिकाऱ्यांनी या परिसरात गस्त घालून वेश्या गृह वेश्या व्यापार बंद करावा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,अमळनेर नगरपरिषदेने या परिसरात कार्यक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.,जिल्हा महिला बालकल्याण अधिका-यांनी वेश्यागृह चालविणाऱ्यांचे समुपदेशन करावे व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी व पर्यायी अन्य व्यवसाय करावयास मार्गदर्शन व मदत करावी,कॉलेजच्या अविवाहित मुला मुलींना वेश्यागृह बालविणाऱ्या महिला खोती, जागा जाता करून देतात व त्यांच्याकडून पैसे वसूल करतात ते थांबवावे, अल्पवयीन मुलींना जबरदस्ती आणून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडते जाते. भरवस्तीत वैश्याव्यवसाय सुरू असल्याने, आजूबाजूला राहणाऱ्या लहान मुला मुलींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. रात्री वे रात्री वेश्याव्यवसाय न करणाऱ्यांचे दरवाजे ठोकले जातात हे प्रकार थांबवावे आदी मागण्या मौलाना यांनी केल्या.
यावेळी प्रा अशोक पवार यांनीही आपली भूमिका मांडत प्रशासन या प्रकरणात गल्लत करीत असल्याचा आरोप केला आणि या वस्तीचे दुसरीकडे पुनर्वसन करावे अशी मागणी केली.यावेळी कुदरत अली,मनोज मोरे,शेर खा पठाण,नावेद शेख, आबीद अली,सोमचंद संदानशीव यासह अनेक जण उपस्थित होते.




