
अमळनेर:- शहरातील धुळे रोडवरील डी डी नगर मधील वन बी एच के येथील रहिवाशी यांनी पाणी पुरवठा पुरेश्या प्रमाणात होत नसल्या मुळे नगरपालिका उपमुख्याधिकारी रविद्र चव्हाण यांना निवेदन दिले.

धुळे रोड येथील दादा साहेब देशमुख नगर येथील वन बि एच के मधिल ५० ते ६० रहिवाश्यांनी दि २४ रोजी एकत्र नगरपालीकेत येवून आपली पाण्याची समस्या मांडत ती लवकरात लवकर सोडवावी अशा आशयाचे निवेदन नगरपालिका उपमुख्याधिकारी यांना देण्यात आले व त्यांनी लवकर आपली समस्या सोडवण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिले. या वेळी नगर पालिका कर्मचारी मनोज निकुंभ सह डि डी नगर मधिल रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




