
वकिलांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ केला ठराव, तहसीलदारांना निवेदन
अमळनेर-भुसावळ बार असोशियनचे सदस्य अॅड. प्रविण कोळी व त्यांच्या आईवर झालेला चाकु हल्ला आणि धडगांव वकील संघाचे सदस्य आपसिंग वळवी यांच्यावर विरुध्द पक्षकाराने केलेला जिवेघेणा हल्ला या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ अमळनेर वकील संघाने 27 रोजी कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.तत्पूर्वी यासंदर्भात अमळनेर वकील संघाची बैठक 26 रोजी घेण्यात आली त्यात सर्व उपस्थित सदस्यांनी दोन्ही घटनांचा निषेध करत त्या निषेधार्थ दि. 27 रोजीच्या कामकाजात अमळनेर वकिल संघ सहभाग घेणार नाही असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला व वकील संरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. याबाबत शासनास व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांना निवेदन पाठविण्यात यावे. असे सर्वानुमते ठरले.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ऍड किरण पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते.




