
नगरपरिषदेत महिलांचे ठिय्या आंदोलन
अमळनेर-गेल्या 15 ते 20 दिवसापासून विद्या विहार कॉलनी, मुंदडा नगर सोनार नगर ई.भागात पाणी पुरवठा झालेला नाही तसेच 15 ते 20 कॉलनीचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून वारंवार पाईप लाईन फोडणाऱ्या 80 फुटी रींग रोड च्या ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी पालिकेत काल ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यासंदर्भात 21 तारखेला नगरपरिषदेकडे माजी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांनी पत्र व्यवहार केला होता तरीही कोणतीही कार्यवाही झालीच नाही, याउलट पाणी पुरवठा अजून 15 दिवस लांबल्या मुळे स्थानिक नागरिक व महिलाचा संयम सुटला त्यानी एकत्र येत कमलबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या दालनात महिलांनी ठिय्या आंदोलन केले मी स्वतः जागेवर येण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्या नंतर मोर्चा मागे घेण्यात आला. मोर्च्यात रवि पाटील सोबत मिलींद पाटील, संजय पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, कल्पेश साळूंखे, माळी ताई, वैशाली शेवाळे, सुनीता शिंदे, रंजना सनदाशिव, वैशाली गोसावी, ज्योती वारुळे, ललिता चौधरी, वर्षा पाटील यांच्यासह 100 महिला उपस्थित होत्या.




