
पुनर्वसन अधिकाऱ्यांसह टीम ला पाठवून जाणून घेतली सद्यस्थिती
अमळनेर-तालुक्यातील मौजे बोहरे गावाचे पूर्णतः पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी झालेली विशेष ग्रामसभा व जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन तात्काळ जिल्हा पुनर्वसन अधिकारी पाटोळे व त्यांच्या टीमला बोहरे येथे पाठवून सद्यस्थीतीची परिस्थिती जाणून घेतली.

याबाबत वृत्तपत्रांनी ठळक वृत्त प्रकाशित केले होते.अधिकारी उपस्थित झाल्यानंतर यावेळी मोठ्या संख्येने गावकरी तथा महिला व पुरुष यांनी उपस्थित राहून बोहरे गावाच्या परिस्थितीची जाणीव करून देत आक्रोश केला. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी पाटोळे यांनी याबाबत पुढील कार्यवाहीचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी विकास पाटील या गावातील तरुणाने गावाची सर्व माहिती व परिस्थिती अधिकाऱ्यांना अवगत करून दिले,तर ग्रामस्थांनी निवेदन देऊन ग्रामसभेचा मंजूर ठराव ही निवेदनात दिला. या वेळी अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी भूषण पाटील, सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच देविदास फुलपगारे व सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.




