
अमळनेर:- प्रत्येक नात्याला अर्थपूर्ण शब्द देणाऱ्या अहिराणीतील कथा घरे घर संदेश , सोना ना खान्देश असा संदेश देणाऱ्यां आहेत असे कथाकथन सत्राच्या अध्यक्षीय भाषणात एस के पाटील यांनी सांगितले. यावेळी मंचावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष रमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

अहिराणी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रंगलेल्या विविध साहित्य प्रकाराच्या चर्चासत्रांमध्ये अहिरानी बोलीच्या कथाकथनातील सत्र प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ठरले. या सत्रामध्ये अहिराणी कथा लेखक गोकुळ बागुल यांनी बट्ठा बजार येडासना ही माणसांच्या वैचारिक पणावर, विचार शैलीवर विडंबन करणारी कथा सादर केली.
प्राचार्य संजीव गिरासे यांची काशीने जत्रा ही कथा ग्रामीण भागातल्या साहेबराव नाना ह्या व्यक्ती चरित्राला घेऊन माणसाच्या स्वभाव गुणवैशिष्ट्य मांडणारी ठरली.
कथा लेखिका सौ.वृषाली खैरनार यांनी अहिराणी रोड झालेल्या बजेट या शब्दाला घेऊन जगातील शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थितीमुळे फसलेल्या नियोजनाची व त्यातूनही उभारी घेण्याची कथा मांडली. या सत्राचे सूत्रसंचलन प्रमोद चौधरी यांनी केले.आभार डी ए पाटील यांनी मांडले.




