
“आयत पोयत सख्यान” नाट्याचा ४९६ वा एकपात्री प्रयोग सादर
अमळनेर:- भाषा हे हुशारी दाखवण्याचे नव्हे तर संवाद साधण्याचे माध्यम आहे असे सुप्रसिद्ध एकपात्री नाटककार प्रविण माळी यांनी दुपारच्या सत्रात अहिराणीतील विविध कला प्रकारात सादर केलेल्या “आयत पोयत सख्यान” नाट्याचा ४९६ वा एकपात्री प्रयोग सादर करतांना केले.आपल्या मायबोलीतील एक समृद्ध पान आपल्या लेकरांना द्यायलाच हवे असे सांगत खान्देश पट्ट्यातील विविध गावांमधील अहिराणी बोलीतील लकबी एकपात्री नाट्यातून सादर करीत माळी यांनी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले.

‘अहिराणी मनी माय शे , डोक ठेवा तिने पाय शे’ असा संदेश देत सेवानिवृत्त तहसीलदार अहिराणी सेवक सुदाम महाजन यांनी अहिरानीना झटका या सदरात बहारदार सादरीकरण केले.सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट अहिरानी मिमिक्री सादर केली.यावेळी मंचावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दिनेश नाईक हे उपस्थित होते.प्रा. डॉ.लिलाधर पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर रणजित शिंदे यांनी आभार मानले.




