
विविध मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा
अमळनेर:- शहरात ईद उल फितरच्या पर्वावर अमन आणि शांतीचा वातावरण राहो, तसेच भाईचारा प्रस्थापित होवो, अशी प्रार्थना करत आज सकाळी ईदगाह मैदानावर ईद उल फितरची नमाज अदा केली गेली. ईदच्या चंद्राचा दर्शन झाल्यानंतर, आज सोमवारी सकाळी ८ वाजता गांधलीपूरा येथील ईदगाह मैदानावर मौलाना नौशाद आलम या इमामा खाली हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली.

नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी व पुनर्वसन मंत्री व आमदार अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, उपअधिक्षक केदार बारबोले, पी. आय. दत्तात्रेय निकम, नपा मुख्याधिकारी तुषार नेरकर माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, राजू संदानशिव आदी उपस्थित होते.
नमाज अदा केल्यानंतर सर्वजण कब्रिस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांसाठी दुआ केली. शहरभरात सर्वत्र ईदच्या आनंदात एकता आणि प्रेम दिसून येत होते. तसेच, शहरातील प्रत्येक मोहल्ल्यात छोटे-लहान मुलं एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत होते. हिंदू-मुस्लिम एकतेचा देखील अनुभव मिळाला, सर्वांनी शीरखुर्मा चा स्वाद घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या.




