
अमळनेर : अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला पूजेचे मानकरी मारवड हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक संजय हिम्मतराव साळुंखे हे सपत्नीक होते.

प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थांचा मंदिर परिसर विविध फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. त्यामुळे परिसरात भक्तिमय व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी गणपती पूजन पुण्याहवाचन आचार्य रुत्विजपूजन, पादुका षोडशोपचार पूजन, लघुरुद्राभिषेक होऊन धूपदीप नैवैद्य आरतीने पूजेची सांगता झाली.
मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, सारंग पाठक, सुनील मांडे, वेंकटेश कळवे, शुभम वैष्णव, ऋषिकेश कुलकर्णी, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, मंदार कुलकर्णी, नरेंद्र उपासनी यांनी पौराहित्य केले. त्यांना गोपाल पाठक, प्रवीण भंडारी, चेतन नाईक व किशोर कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.