
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथे घरासमोर अंगणात लावलेली युनिकॉर्न गाडी रात्रीतून लंपास केल्याची घटना २९ रोजी पहाटे घडली आहे.

याबाबत चौबारी येथील महेश गोरखनाथ सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्या मालकीची ६० हजार किमतीची होंडा युनिकॉर्न कंपनीची दुचाकी २८ रोजी रात्री ११:४५ वाजता अंगणात लावली होती. २९ रोजी सकाळी त्याने उठून पाहिले असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता काहीच तपास न लागल्याने अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्याने मारवड पोलिसात तक्रार दिली आहे. पुढील तपास हेकॉ शरीफखान पठाण हे करीत आहेत.




