
अमळनेर:- शहरातील कसाली मोहल्ल्यातील रहिवासी व वृत्तपत्र वितरक आणि समाजातील कर्तव्यदक्ष नागरिक अलाउद्दीन यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले. अलाउद्दीन यांनी गेली ५० वर्षे दररोज सकाळी मोहल्ल्यात घराघरात वृत्तपत्रे पोचवली. त्यांची मेहनत आणि समर्पण त्यांच्या कामात स्पष्टपणे दिसत होती.

अल्प उत्पन्न असूनही त्यांनी आयुष्यभर आपल्या कामात निष्ठा ठेवली. उष्णतेची लाट असो किंवा पावसाचा वर्षाव, अलाउद्दीन यांनी कधीही आपले कर्तव्य सोडले नाही. त्यांच्या कष्टामुळे अनेक घरांमध्ये रोजच्या बातम्या पोहोचल्या. अलाउद्दीन यांचे दोन मुलगे आणि दोन मुली आहेत. त्यांची कष्टाची शिकवण आणि त्यांचा साधा पण समर्पित जीवन जगण्याचा दृष्टिकोन समाजासाठी एक आदर्श ठरला आहे.