
अमळनेर :मालमत्तेच्या वादावरून जेठ व पुतण्याने महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला व सासूला मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना १ रोजी रात्री साडे दहा वाजता गांधलीपुरा येथील सिद्धार्थ चौकात घडली.

पीडित महिलेने फिर्याद दिली की १ रोजी तिचा जेठ जय इतवारी चव्हाण आणि पुतण्या बाबा उर्फ गगन जय चव्हाण हे मालमत्तेच्या वादासाठी घरात मागच्या बाजूने आले आणि तिची सासू ला शिवीगाळ व धक्काबुक्की करायला लागले. त्यावेळी महिलेचे पती त्यांना समजाविण्यास गेले असता त्यांनी महिलेच्या पतीला चापट बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. महिला भांडण आवरायला गेली तेव्हा जेठ जय याने तिचा विनयभंग केला. आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडवले. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला जय व बाबा उर्फ गगन चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७६ , ३२९(२) , ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.




