
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांचा राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनात सपत्नीक 2025 चा अहिराणी गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच “घर संसार” अहिराणी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता, तसेच पत्रकार संभाजी देवरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अहिराणी साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले.

अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करणारे खान्देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांना साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हेरून निवड समितीने निवड केलेल्या पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांनी खान्देशातील कानबाईचा लोकोत्सव, अंबिका मातेचा चैत्रोत्सव, पाडळसरे धरणाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा यावर अहिराणी भाषेतून तयार केलेल्या रिल्सचा माध्यमातून प्रचार प्रसिद्धी केली. तसेच संभाजी देवरे यांनी पत्रकारिता, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य महत्वाचे ठरले, ज्यामुळे त्यांना या खास पुरस्काराने गौरवण्यात आले. अहिराणी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अविरत कामगिरीचा करत कौतुक व्यक्त केले. राज्यस्तरीय 5 व्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात संमेलनाचे उदघाटक जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्याहस्ते संभाजी देवरे व वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष प्रा अशोक पवार,स्वागताध्यक्ष डि डि पाटील,मुख्य समन्वयक रणजित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती, वसंतराव जिभाऊ पाटील व संभाजी देवरे यांना अहिराणी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांचे तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन होत आहे.