
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील शेतातून जनरेटरचा डायनॅमो अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ रोजी उघडकीस आली आहे.
याबाबत शेतकरी चंद्रकांत भास्कर पाटील यांनी फिर्यादीनुसार त्यांनी त्यांच्या शेतात १२ वर्षापूर्वी मारोती कंपनीचे जनरेटर बसवले असून ८ रोजी सकाळी सालदाराने त्यांना फोन करून जनरेटरची ताडपत्री उघडी असल्याचे कळवले. त्यावेळी चंद्रकात पाटील यांनी येऊन पाहिले असता जनरेटरचा डायनॅमो दिसून आला नाही. आजूबाजूच्या परिसरात डायनॅमोचा शोध घेतला मात्र मिळून न आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध मारवड पोलीसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.




