
अमळनेर : शहरातील तांबेपुरा भागातील श्री जागृत हनुमान मित्रमंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.

त्यानिमित्ताने ११ रोजी सायंकाळी ६ वाजता जागृत हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी शाळा , शिवशक्ती चौक , सानेनगर भागात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच १२ एप्रिल रोजी खान्देश भूषण हभप रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांचे कीर्तन रात्री ८ ते ११ दरम्यान श्री जागृत हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जागृत हनुमान मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.