
अमळनेर:; शहरातील डि.आर.कन्या शाळेत करुणा क्लब तर्फे महावीर जयंती निमित्ताने पक्षांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा संम्पन्न झाली.त्यावेळी विद्यार्थीनींनी घरातील टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी घरटे बनविले. चाळीसच्या वर विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी बनवलेले घरटे शाळेच्या प्रांगणात असलेल्या झाडांवर लटकण्यात आले.पक्षांसाठी घरटे बनवण्यात आली त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि प्राणी कल्याणाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण झाली. जैन मूल्ये समजून घेताना भगवान महावीरांची करुणा,अहिंसा व निसर्गाशी एकरूपता अशी मूल्ये विद्यार्थी शिकले याचा आनंद झाला.सदर उपक्रमास शाळेचे चेअरमन सी. ए. नीरज अग्रवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षिका एस.पी.बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले. घरटे निर्मिती कार्यशाळेचे संचालन करुणा क्लबचे डी.एन.पालवे यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका आर.एस. सोनवणे, बी.एस. पाटील, एस.एस.वाघ उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी मदत केली.शाळेचे सर्व शिपाई बंधू सुटीच्या कालावधीत त्यात दाणे व पाणी टाकण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.