
अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना नागरिकांसह शहरातील संघटनांचे ही समर्थन मिळत आहे.

मोबाईल विक्री दुरुस्ती व्यापारी असोसिएशन, अमळनेर यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांची २० रोजी भेट घेऊन समर्थन जाहीर केले. शहरातील व्यापारी व व्यावसायिक वर्गाच्या समस्या जाणून असणाऱ्या व योग्य उमेदवार असलेल्या जितेंद्र ठाकूर यांना आमचा पाठिंबा असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. “जितुभाऊ तुम आगे बढो” अशा घोषणा पदाधिकारी व समर्थकांकडून देण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे प्रवीण महाजन, महेश नागदेव, निलेश पाटील, निलेश चौधरी, अर्पित संदानशिव, तुषार सोनवणे, गोपाल सोनार, राहुल ठाकूर, तन्वीर मोबाईल, सोहम मोबाईल, तौसीफ शेख, भागवत शेंडे, कैलास पंजावनी, कमल भगवानी, विशाल नाथभाऊ, दिनेश देवासी, प्रवीण देवासी, शरद मोबाईल, प्रमोद बागुल, धवल मोबाईल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.




