
अमळनेर : एसटी आणि ट्रक ची समोसमोर धडक झाल्याने चार पाच जण जखमी झाल्याची घटना जळोद रस्त्यावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाजवळ वळणावर ११ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
ट्रक ने धडक दिल्याने एस टी चा काही भाग कापला जाऊन चालक , वाहक सह दोन तीन प्रवासी जखमी झाले. तर ट्रक पलटी झाल्याने ट्रक चालक फसला होता. लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. हेडकॉन्स्टेबल विनोद भोई यांच्यासह पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.




