
अमळनेर : तालुक्यातील ढेकू खुर्द येथे शॉर्ट सर्किट मुळे आग लागून दोन शेतातील सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मका जळून खाक झाल्याची घटना ११ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
ढेकू खुर्द येथील सचिव संजय संभाजी पाटील यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांचा शॉर्ट सर्किट झाल्याने त्यांनी काढून ठेवलेल्या मक्याला आग लागली. आग पसरून शेजारच्या शेतातील मक्याला देखील लागली. संजय पाटील यांचे ०.९० आर आणि शेजारील ०.३० आर क्षेत्रातील सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा मका जळून खाक झाला. गावकऱ्यांनी प्रयत्न करून शेतातील आग विझवली. नुकसानीचा पंचनामा करून वीज मंडळाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.




