
मारवड पोलिसांनी केले ओळख पटविण्याचे आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील धार ते जैतपीर रस्त्यावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
१० रोजी दुपारी १२:४३ वाजता धार येथील पिरबाबा टेकडीजवळील फकिरा पाटील यांच्या शेताजवळ जैतपीर रस्त्यावर अंदाजे ५० ते ५५ वय असलेला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिस पाटील जगतराव पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मारवड पोलिसांकडून मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.