
अमळनेर : पिकअप व्हॅन आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास टाकरखेडा गावाच्या विठ्ठल मंदिराजवळ घडली.
हर्षल अशोक पाटील वय २८ रा सडावण हा त्याची मोटरसायकल क्रमांक एम एच १९ इ एल ४८१८ वर जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन क्रमांक एम एच १८ , बी जी ८४० वरील चालकाने हयगय न करता वेगाने गाडी चालवून मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. मयताचा चुलत भाऊ मनोज प्रकाश पाटील याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून पिकअप व्हॅन चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

