
अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर येथील एकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी घडली आहे.
प्रवीण गणेश पाटील (वय ३२) असे मयत इसमाचे नाव असून ११ रोजी सकाळी १० वाजता ते जैतपीर येथील रेल्वेपुलावर ट्रॅकजवळ जखमी अवस्थेत पडलेले दिसून आल्याने भोरटेक स्टेशन मास्टर अविनाश पाटील यांनी ॲम्ब्युलन्स बोलवून ग्रामीण रुग्णालयात पोहचवले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी किरण पाटील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.