
अमळनेर:- शहरातील आर. के.नगर भागातून ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील श्रीकृपा सोसायटी,आर.के.नगर भागात राहणारे योगेश रामकृष्ण पाटील यांची टीव्हीएस स्टार कंपनीची मोटारसायकल (एम एच १९ डीबी ५६५५) २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कामावरून येऊन घरासमोर लावलेली होती.दुपारी ४ वाजता घराबाहेर निघाले असता मोटारसायकल घराच्या बाहेर अंगणात लावलेली दिसून आली नसल्याने कुणीतरी अज्ञाताने ती चोरून नेली असल्याने योगेश पाटील यांनी अज्ञात चोरट्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे.पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करत आहेत.