
सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील व माजी नगरसेवक विकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..
अमळनेर:- शहरातील वडचौक परिसरातील सुप्रसिद्ध हनुमाननगर भागातील तरुणाईने एकत्र येवून आपल्या भागात मनमोहक श्री मारोतीरायाचे स्मारक बनवले असून सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना पाटील व माजी नगरसेवक विकांत पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन संपन्न झाले.

हनुमान जयंतीचे औचित्य साधत विधायक अन ठोस सर्वांना स्मरणात राहून प्रेरणादायी ठरेल असे सुंदर व आकर्षित “हनुमान नगर” नाम स्मारक तयार करून स्वप्ना पाटील व विक्रांत भास्करराव पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी जल्लोषात उद्घाटन कार्यक्रम घडवुन आणला. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




