
अमळनेर : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांसाठी आणि शहरातील नागरिकांसाठी मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर साहेबांनी थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई अमळनेर नगरपरिषदेत बसवून एका चांगल्या उपक्रमाचा पायंडा पाडला असून या बाबत मुख्याधिकारींचे कौतुक होत आहे.
बसस्थानकाजवळ ही पाणपोईचे उद्घाटन…
अमळनेर येथील बस स्थानकाजवळील हॉटेल संजय बिअर बार चे मालक मा. नगरसेवक स्व. बाबासो संजय चौधरी यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.व अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला त्यांचे पूत्र हॉटेल संजय चे संचालक पवन चौधरी व नंदु चौधरी हे सलग अकरा वर्षांपासून हा समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. उन्हाळ्यात पादचारी तसेच प्रवासी यांना याचा लाभ होतो. उद्घाटनप्रसंगी हॉटेल संजय चे संचालक तेली युवा समितिचे मा.अध्यक्ष पवन संजय चौधरी, नंदु चौधरी गिरीश चौधरी,शशिकांत आढावे, पारधी सर, नाना पाटील,दत्तू लांडगे, अनिल चौधरी, नाना राऊळ, किसन पाटील इत्यादी उपस्थित होते.




