
अमळनेर – तालुक्यातील माजी आमदार आणि ज्येष्ठ फिजिशियन यांना धुळे जिल्हा एम.डी.फिजिशियन असोसिएशनचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.पाटील हे सन 1973 पासून एम.डी. फिजिशियन म्हणून राजकारणात सक्रिय राहून देखील अविरत वैद्यकीय सेवेमध्ये धुळे व अमळनेर येथे त्यांचे कार्य अतुलनीय राहिलेले आहे. तसेच गरिबांची जाणीव असलेला आणि कमीत कमी पैशात अखंड वैद्यकीय सेवा देणारा डॉक्टर म्हणून इतरांपेक्षा वेगळा असा समाजात ठसा उमटवला आहे. सलग 52 वर्षापासून आजही ते रुग्णांना अविरत वैद्यकीय सेवा देत आहेत.त्यामुळे त्यांचा हा आदर्श इतर डॉक्टरांनी घेण्यासारखा आहे.