
अमळनेर : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्धवासी विजय युवराज सोनवणे यांच्या समरणार्थ विशाल सोनवणे यांनी १५०० लोकांना अन्नदान केले.
१४ एप्रिल रोजी गांधलीपुरा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय आला होता. अनेक जण लांबून आल्यामुळे विशाल सोनवणे यांच्या तर्फे सुमारे १५०० लोकांना अन्नदान केले. यासाठी त्यांना विकास कुमावत, उमेश सोनवणे, मुस्तफा पठाण, शाहरुख शेख, ओम बिऱ्हाडे, कुणाल खरारे, राव पाटील,दुर्गेश सोनवणे, निखिल पाटील यांचे सहकार्य लाभले.

