
आदिवासी महिलेची चौदा जणांविरुद्ध मारवड पोलिसांत फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथील आदिवासी समाजाच्या महिला व पुरुषांना जातीवाचक शिवीगाळ करत गावाबाहेर काढण्याची धमकी देणाऱ्या चौदा जणांसह इतरांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनंदाबाई खंडेराव भील रा. सात्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सात्री येथील मराठी शाळे समोर फिर्यादी महिला, सुशिलाबाई रमेश भिल, लताबाई मगन भिल, सुभाबाई तानकु भिल व गावातील इतर महिला तसेच सुनिल चैताम बोरसे, शालीग्राम संतोष बोरसे, पुंडलीक बाबुराव पाटील, श्रीराम युवराज भिल, सुकलाल गोविंदा भिल हे सर्वजण हळदीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी उभे होते. तेव्हा तेथे योगेश प्रल्हाद पाटील, मनोहर उत्तम पाटील, संदीप सुरेश पाटील, समाधान देविदास पाटील, राजेंद्र भावराव पाटील, पुनिलाल सखाराम पाटील, मालुबाई पुनीलाल पाटील, संजय मधुकर पाटील, प्रशांत रामचंद्र पाटील, भाग्यश्री संदीप पाटील, शालीक पोपट पाटील, मालुबाई शालीक पाटील, विजयाबाई संजय पाटील सर्व रा.साञी तसेच ज्ञानेश्वर प्रकाश पाटील रा. निंभोरा ता. अमळनेर व इतर १० ते १५ स्त्रिया माणसे आले. व त्यांनी सर्वांनी एकत्र येत फिर्यादी महिला व तिच्या समाजाच्या लोकांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही भिलटे लोक महेंद्रच्या पोटचे झाले आहेत. तसेच शिवीगाळ करत ‘तुम्ही गावात कसे राहतात ? तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी महिलेने मारवड पोलिसात तक्रार दिल्याने व्यक्तींविरुद्ध ऍट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्रशिक्षणार्थी डीवायएसपी केदार बारबोले हे करीत आहेत.




