
अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथे एकाला मारहाण करून गाडीत डांबत पैसे लंपास केल्याची घटना १६ रोजी सायंकाळी घडली आहे. याबाबत चौघांविरुद्ध मारवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी संदीप सुरेश बोरसे (वय ३५) याने दिलेल्या तक्रारीनुसार, १६ रोजी सायंकाळी ७ वाजता गावातील मराठी शाळे समोर फिर्यादी त्याची पिकअप गाडी वर लग्नाचे वराड बसविण्यासाठी जात असता तेथे महेंद्र शालीग्राम बोरसे, विनोद शालीग्राम बोरसे, मनोहर पुडंलिक बोरसे, शालिग्राम संतोष बोरसे (सर्व रा. सात्री ता. अमळनेर) असे उभे होते व त्यांनी जुन्या वादाचा मनात राग ठेवुन फिर्यादीला लाथाबुक्यानी पोटावर व डोक्याला मारहाण केली व आज तुला जिवत ठेवणार नाही अशी अशी धमकी देवुन शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनी फिर्यादीला पकडुन पिकअप गाडी मध्ये बंद करुन कोंडून ठेवले व गाडीचे दोन्ही दरवाजे बाहेरुन चाबीने लॉक करुन डांबले. खुप मारहाण झाल्याने फिर्यादी गाडीत बेशुध्द झाला होता. त्यानंतर त्याला रात्री १० वाजता डॉ. विक्रांत पाटील यांच्या पदमश्री हॉस्पीटल अमळनेर येथे उपचारासाठी दाखल केल्यावर तेथे फिर्यादीची पत्नी भाग्यश्री संदीप पाटील व चुलत भाऊ योगेश प्रल्हाद पाटील हजर होते. तेव्हा पत्नी भाग्यश्री हीने त्याला सांगीतले की, त्यांनाही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत चौघांनी गाडीच्या काचा फोडुन निघुन गेले. तसेच फिर्यादीच्या खिश्यात असलेले 25,700/-रुपये मारहाणीच्या वेळी गहाळ झाले आहेत. पदमश्री हॉस्पीटल अमळनेर येथे उपचार घेतल्यानंतर सिव्हील हॉस्पीटल धुळे येथे उपचार घेऊन फिर्यादीने फिर्याद दाखल केली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.