
अमळनेर-येथील पंचायत समितीत राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी होते. प्रशासन अधिकारी कैलास पाटील तसेच श्री. भदाणे व सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हजर होते.यावेळी प्रमुख पाहुणे यशदाचे राज्यस्तरीय प्रविण प्रशिक्षक सुनिल अहिरराव यांनी पंचायत राजचा इतिहास,७३ वि घटना दुरुस्ती,शाश्वत विकासाची ध्येय, पंचायत विकास निर्देशांक इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.शेवटी उपस्थिताना प्रमाणपत्र देऊन कार्यक्रम संम्पन्न झाला.




