
अमळनेर-येथे सक्षम देवगिरी प्रांत यांच्या माध्यमातून मोफत कृत्रिम पाय व हात रोपण शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक 28 रोजी पीबीए इंग्लिश मिडीयम स्कुल,अमळनेर येथे करण्यात आले आहे.
हात, पाय नसल्यामुळे जीवनात निराश न होता, नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम हात व पाय बसवून दिव्यांग बांधवानी पुन्हा जीवनात उभारी घ्यावी या उदात्त हेतूने सक्षम देवगिरी प्रांत यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिर अमळनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आले आहे.सोमवार, दि.28 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठिकाण रोटरी हॉल, पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कुल, बस स्टेंड समोर, अमळनेर हे शिबीर होणार आहे. तरी ज्यां दिव्यांगांना कृत्रिम हात, पाय किंवा कॅलिपर्स यांची आवश्यकता आहे त्याच दिव्यांगांनी आपल्या हाताचे व पायाचे मोजमाप या शिबिरामध्ये करावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, स्वतःचा फोटो, वैद्यकीय प्रमाणपत्र (UDID कार्ड) असणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी आनंद माळी 93715 91600 सुरेंद्र साळुंखे 7350246288, हितेश शहा 88060 79971 स्वर्णदिप राजपुत 88889 17651,हेमंत सैंदाणे 90212 47249 व संकल्प वैद्य 73878 06474 यांचेशी संपर्क साधावा.

