
अमळनेर : अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी घडली आहे.
तालुक्यातील करणखेडे येथील महेश बारीकराव पाटील (वय ५० ह मु सुरत) याने २५ रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शेतात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सरपंच महेंद्र पाटील यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला. काही क्षणातच १०८ रुग्णवाहिका हजर झाली. डॉ इम्रान कुरेशी यांनी प्राथमिक उपचार केले. महेश ची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांनी रुग्णाला सरळ धुळे येथे हलवले. महेश ७५ टक्के भाजला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

