
तुमची माणुसकी, तुमची मदत तिचं आयुष्य वाचवू शकते

अमळनेर:- अवघ्या १६ महिन्यांची निष्पाप चिमुरडी – वेदश्री लक्ष्मीकांत सोनार तिच्या नाजूक शरीरात एका अश्या त्रास देणाऱ्या आजाराशी झुंजतेय, ज्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. नुकतंच पायावर उभी राहिलेली, अजून “आई” म्हणायचं बाकी आहे… पण नियतीने तिला अश्या छायेखाली उभं केलंय. तिच्या कानशंखात “Bilateral Acoustic Neuroma / Vestibular Schwannoma” नावाचा आजार असून तो केवळ तिचं ऐकणं हिरावून घेतोय नाही, तर तिचं बोलण्याचे आयुष्यच घेऊ पाहतोय. जर ती ऐकू शकली नाही तर बोलू शकणार नाही… म्हणूनच ही लढाई वेळेची आहे आणि आता फक्त आपली माणुसकीच तिचं जीवन वाचवू शकते.

दुर्मिळ आजाराची गंभीरता
या आजाराने वेदश्रीच्या दोन्ही कानांशी संबंधित नसांवर परिणाम केलाय. जगात हजारांमध्ये एखाद्यालाच होणारा हा आजार, वेदश्रीच्या छोट्याशा आवाजाला गिळू पाहतोय. तिला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, आणि आता तिचं हसणंही थांबू लागलंय. मुंबईतील व नाशकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे — कारण वेळ गेली तर तिचं आयुष्यही हातातून निसटेल.
एक सामान्य बाप, एक असामान्य संकट
लक्ष्मीकांत सोनार – एक सर्वसामान्य बाप. आपल्या बाळाच्या चेहऱ्यावरचं हसू परत मिळवण्यासाठी त्याने जमेल ते सगळं केलंय. नातेवाईक, मित्र, गावकरी – ज्याने जे शक्य ते केलं. पण तरीही सुमारे ३० लाख रुपये कमी पडत आहे. जे या कुटुंबासाठी स्वप्नवत आहेत. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, पण मनात अजूनही आशा आहे – आपल्या मदतीची.
मदतीचा एक हात, जीवनाचं संजीवनी तिचं आयुष्य वाचवण्यासाठी, तिच्या आईवडिलांना पुन्हा हसवण्यासाठी फंडरेझिंग प्लॅटफॉर्मवर वेदश्रीसाठी एक अभियान सुरू करण्यात आलं आहे. https://www.ketto.org/fundraiser/help-this-baby-get-a-second-chance-at-life-this-baby-is-battling-between-life-and-death-please-support-1002484
📲 PhonePe डोनेशन लिंक : https://fundraiser-request-to-help-this-baby.amalner360.com/
👉 QR कोड स्कॅन करून देखील देणगी देता येते. 🧾 १२A आणि ८०G अंतर्गत आयकर सवलतही उपलब्ध आहे.
अमळनेरकरांनो, आता तुमचं पाऊल पुढे टाका
Charity Foundation, CM Fund, PM Fund अनेक ठिकाणी मदतीचा हात मागितला आहे. पण सगळ्यात मोठा आधार असतो, आपला समाज. जर ३०,००० लोकांनी फक्त १०० रुपये दिले, तरी तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. शाळा, महाविद्यालयं, व्यापारी, डॉक्टर, मंडळं, राजकीय संघटना – प्रत्येकाने या बाळासाठी काहीतरी केलं पाहिजे. तिचं आयुष्य आपल्या हातात आहे.


