
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील सु. हि. मुंदडे हाय. व श्रीमती द्रौ. फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, मारवड
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रू /मार्च 2025 ( इ.12 वी) चा निकाल 79.62% लागला आहे. प्रथम क्रमांक धिरज अरुण पारधी (72.83%), द्वितीय क्रमांक नंदिनी युवराज भोई 70.83% व तृतीय क्रमांक पूजा आसाराम सोनवणे 68.50% यांनी पटकावला आहे.

ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड या संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील उपाध्यक्ष देविदास साळुंखे, सेक्रेटरी देविदास पाटील आणि सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर वृंद यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


