
अमळनेर:- येथील कृषी विभागातर्फे 6 मे रोजी तालुका कृषी अधिकारी अमळनेर यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

सदर कार्यशाळेत आमदार अनिल पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. इंगळे उपस्थित होते. कृषी अधिकारी ठाकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. राम बायोटेकचे कृषी तज्ञ राजेंद्र पाटील यांनी कापूस व मका पिक नियोजन यावर मार्गदर्शन केले. नेटाफिमचे जितेंद्र वाघ व मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार एचटीबीटी कापूस लागवडी प्रतिबंध यावर माहिती दिली.

कृषी पर्यवेक्षक प्रवीण पाटील यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना माती नमुने कसे घ्यावे बियाणे उगवण शक्ती, जीवामृत तयार करणे, कीटकनाशके फवारणी करताना घ्यायची काळजी यांचे प्रात्यक्षिके कृषी विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना करून दाखवले.





