
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे कै. बहिणाबाई समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय व बापुसो एच एस पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने ८ रोजी मोफत मोफत नेत्र व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. हिंमतराव शिवदास पाटील (एच. एस. बापू) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मृतीदिनी दरवर्षी शिबिराचे आयोजन करण्यात येते. नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कोळी व दंतरोग तज्ञ डॉ. मयूर प्रकाश कोळी यांची शिबिरात प्रमुख उपस्थिती राहणार असून रुग्णाची तपासणी करतील. शिबिरात आढळलेल्या रुग्णांचे लेन्स ऑपरेशन मोफत करण्यात येणार असून चष्मा अल्पदरात उपलब्ध असणार आहे.

८ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत कै. बहिणाबाई समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय धार येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मयूर हिंमतराव पाटील व प्रमोद हिंमतराव पाटील यांनी केले आहे.


