
अमळनेर-पाकिस्तानच्या मदतीने आतंकवाद्यांनी काश्मीर मध्ये हिंदू नागरिकांवर केलेल्या हल्ल्याला लगेचच काही दिवसात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून जशास तसा ठोसा दिल्याने या कणखर भूमिकेबद्दल अमळनेर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकात जल्लोष व फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी पेढे वाटप करण्यात आले व पाक विरोधी घोषणा देण्यात आल्या.यावेळी ॲड व्हि आर पाटील,शितल देशमुख,हिरालाल पाटील,अजय केले,विजय राजपूत, उमेश वालहे, हरचंद लांडगे, दिलीप ठाकूर, गोकुळ परदेशी, महेश पाटील, कैलास भावसार, सुभाष पाटील,रमेश शिरसाट, शेखर कुलकर्णी, देवा भोई, चेतन जाधव, दीपक बोरसे,मुन्ना कोळी, योगीराज चव्हाण, सागर बारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते .



