
पांडुरंग पंढरपूर सोडून प्रतिपंढरपूर अमळनेरात आल्याची अडीचशे वर्षांची आख्यायिका…
अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील परंपरेप्रमाणे गुरूने अमळनेरच्या वेशीवर जाऊन शिष्याचे स्वागत केले व सन्मानाने मिरवणुकीने वाडी संस्थान मध्ये आणले. बेलापूरकर महाराज(मनू महाराज) अमळनेरात आले म्हणजे थोर भक्त पांडुरंग पंढरपुरातून प्रति पंढरपूर अमळनेर येथे आलेले असतात अशी आख्यायिका आहे.

संत सखाराम महाराजांचे शिष्य हभप मोहन बेलापूरकर महाराज यांचे ६ रोजी रात्री आर के फॅक्टरीत आगमन झाले. सकाळी बेलापूरकर महाराज आर के नगरच्या गणपती मंदिरात आले. उद्योगपती विनोद पाटील व त्यांच्या परिवाराने परंपरेप्रमाणे त्यांचे पाद्यपूजन केले. गुरू संत सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांनी आर के नगर मध्ये जाऊन आपले शिष्य हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे स्वागत केले. तेथून दोघे गुरू शिष्य शिग्राम मध्ये बसले. शिग्राम पुढे बाल वारकरी आणि भजनी मंडळ टाळ मृदुंग वाजवत विठ्ठल नामाचा , पांडुरंगाचा नाम जप करत संत सखाराम महाराजांचा जयघोष करत वाडी संस्थांनकडे रवाना झाले. रस्त्यात अनिल जोशी , पोळ ,अंबिका फोटो स्टुडिओ यांच्याकडे पानसुपारी झाली.

यावेळी रवींद्र देशमुख , दिलीप देशमुख , विवेक देशमुख , उदय देशपांडे , मनोज भांडारकर , अनिल जोशी ,केतन जोशी , पवन शेटे, किरण पाटील , वैद्य , शुक्ल , भाऊसाहेब देशमुख ,सुनील चौधरी ,दीपक रामलाल पाटील हजर होते. सिद्धांत शिसोदे व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली.


