
अमळनेर : उघड्यावर गांजा पिणाऱ्या इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याला अटक केल्याची घटना ९ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता अमळनेर शहरता राणीलक्ष्मीबाई चौकात घडली.

९ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे डी बी पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना राणी लक्ष्मीबाई चौकात उघडयावर एक जण गांजा ओढत असल्याचे समजताच हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशीव ,प्रशांत पाटील ,उज्वल म्हस्के , नितीन कापडणे यांनी छापा टाकला. त्याचे नाव मनोज संभाजी सैंदाणे वय ५३ रा शिवाजीनगर शिरूड नाका असे सांगितले. त्याच्याकडून गांजा पिण्याचे साहित्य जप्त करून मनोजला अटक करण्यात आली. मनोज विरुद्ध एनडीपीएस अधिनियम १९८५ च्या कलम ८(सी) व २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.






