
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे खू गावामध्ये जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी धरती माता शेतकरी गट पिंपळे गावातील ग्रामस्थ सेवा सहयोग संस्था पाणी फाउंडेशन लोकसहभाग सर्वांच्या प्रयत्नातून गावामध्ये सुरू असणारे जल व मृदा संधारणाच्या नाला खोलीकरण कामाची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला ही भेट दिली व कौतुक केले. तसेच धरती माता गटाने या जल मृदा संदर्भाच्या कामासाठी केलेले प्रयत्न समजून घेतले व उपस्थित महिलांचे व मान्यवरांचे लोकसभागातून व संस्थेच्या मदतीतून सुरू असणाऱ्या कामाचे खूप कौतुक केले.

ग्रामपंचायतीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत ग्रामस्थांच्यावतीने प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच अमळनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी एन आर पाटील यांनी सुद्धा या कामाची पाहणी केली तसेच उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले पिंपळे गावातील शेतकरी यांना मॉडेल शेत बनवण्यासाठी जलतारा, विहीर पुनर्भरण, बांधबंधिस्ती ,बांधावरील फळबाग, गांडूळ खत, गोटा शेड अशी कोणतीही प्रकारची कामे कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तात्काळ मंजूर करून देण्याचा शब्द दिला.

या कार्यक्रमात साठी गावातील तंटामुक्त अध्यक्ष निंबा बापू चौधरी,रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, पाणी फाउंडेशन चे सर्वाधिकारी सुनील पाटील, गुणवंत पाटील, सेवा संयोग संस्थेचे अधिकारी सुरेश पाटील तसेच ग्रामसेवक किरण लकेश, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका मदने ग्रामरोजगार सेवक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





